दक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रुझ. ती तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. इलियानाला तमिळ सिनेसृष्टीतून बॅन केलंय अशा सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता याबाबतचं सत्य समोर आलं आहे.

इलियाना डिक्रूझने एका तमिळ चित्रपटासाठी ॲडव्हान्स रक्कम घेतली होती. परंतु तिने पैसे घेऊनही त्या चित्रपटाचं शूटिंग केलं नाही. यामुळे त्या चित्रपट निर्मात्याचं मोठं नुकसान झालं. नंतर त्या प्रोड्युसरने निर्माता परिषदेकडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीनुसार तामिळ चित्रपट निर्मात्यांनी इलियानाला कोणत्याही चित्रपटासाठी साईन न करण्याचा निर्णय घेऊन तिला बॅन केलं असं बोललं जाऊ लागलं होतं. पण यात किती टक्के आहे याचा खुलासा आता झाला आहे.

आणखी वाचा : “मराठी चित्रपटांतील विनोदाचा दर्जा…” रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य जाणून घेण्यासाठी तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलशी चर्चा करण्यात आली. तेव्हा हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. TFPC कडून अशी कोणतीही बंदी इलियानावर घालण्यात आलेली नाही, असं TFPCचं म्हणणं आहे. त्यामुळे या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसून या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘एकच बिकिनी आहे का?’ व्हेकेशन फोटोंमुळे इलियाना डिक्रुझ झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलियानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा ती दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. तर टॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही तिने आपली ओळख निर्माण केली. आज तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण गेली तीन-चार वर्ष ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली नाही. 2018 मध्ये रवी तेजाच्या ‘अमर अकबर अँथनी’मध्ये दिसली होती. त्यामुळे इलियानाला बॅन केलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं.