scorecardresearch

Premium

‘कॉफी विथ करण ७’ चा प्रोमो झाला प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार भेटीला

‘कॉफी विथ करण ७’ व्या सीझनचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

koffee with karan 7 karan johar
'कॉफी विथ करण ७' व्या सीझनचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करण हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त करण नाही तर त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो देखील तितकाच चर्चेत असतो. हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या शोमध्ये सेलब्रिटी हजेरी लावतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देतात. खरंतर या शो मध्ये करण खूप वैयक्तिक प्रश्न देखील विचारतो, यासोबत अनेकदा मजेदार प्रश्नांचा देखील भडिमार असतो. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत हा ‘कॉफी विथ करण’चा ७ वा सीझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या विषयी सांगितले आहे.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रोमोमध्ये सुरुवातीला सगळेजण या शो ला पसंत करतात आणि याच्या नव्या सीझनच्या प्रतिक्षेत आहेत, असे करण बोलतो त्यानंतर स्क्रिनवर नेटकऱ्यांचे ट्वीट दिसू लागतात, जे त्याला ट्रोल करत आहेत. पुढे तो स्वतः फोन करुन, सेलिब्रिटींच्या हाता-पाया पडून त्यांना शो मध्ये येण्यासाठी विनवणी करताना दिसतोय. मी तुम्हाला कुठलाच वैयक्ति प्रश्न विचारणार नाही असं वचनही करण सेलिब्रिटींना देताना दिसतोय. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : पापाराझींना कसं कळतं की सेलिब्रिटी कधी आणि कुठे असणार आहेत? मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर

पाहा प्रोमो

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

हा व्हिडीओ शेअर करत ७ जुलै पासून ‘कॉफ विथ करण’ डिस्नी प्सल हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याचे करणने सांगितले आहे. कतरिना कैफ-विक्की कौशलपासून ते रणबीर कपूर-आलिया भट्ट पर्यंत मोठमोठे सेलिब्रिटी या शोमध्ये येणार आहेत. यासोबतच बॉलिवूडचे तीन खान शाहरुख, सलमान आणि आमिर या शोमध्ये एकत्र हजेरी लावणार असल्याचेही म्हटले जातं आहे. पण अद्याप या शोची गेस्ट लिस्ट समोर आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koffee with karan 7 release date promo video viral dcp

First published on: 29-06-2022 at 11:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×