फिल्ममेकर करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील खास गोष्टींचा उलगडा करत असतात. तसचं या शोमध्ये बॉलिवूडमधील गॉसिप जाणून घेण्याची संधी चाहत्यांना मिळते. या शोच्या सातव्या सिझनमध्येही सेलिब्रीटी धमाल करताना दिसत आहेत. ‘कॉफी विथ करण सिझन ७’ च्या तिसऱ्या भागात अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार हजेरी लावणार आहेत. या भागात समांथाने रणवीर कपूरबद्दलच्या तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

‘कॉफी विथ करण सिझन ७’ च्या तिसऱ्या भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात अक्षय आणि समांथा करणसोबत धमाल करताना दिसत आहेत. यात करण समांथाला एक प्रश्न विचारतो. ” तुला तुझ्या बेस्ट फ्रेण्डच्या बॅचलर पार्टीचं आयोजन करायचं असल्यास तू बॉलिवूडमधील कोणत्या दोन हॅण्डसम अभिनेत्यांना तुझ्यासोबत नाचण्यासाठी बोलावशील” यावर समांथांने नाव घेतलं ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंगचं. एवढचं नव्हे तर फक्त आणि फक्त रणवीरलाच बोलवेन असं ती म्हणाली.

हे देखील वाचा: समांथा रुथ प्रभूचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्य भूमिकेत

दरम्यान या प्रोमोमध्ये करणने समांथाला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारल्याचं दिसतंय. मात्र यावर समांथाने करणला थांबवत त्याच्यावरच आरोप केला. “तुला माहितेय का त्या अनेक बिघडलेल्लया संसारांसाठी तू जबाबदार आहेस” असं समांथा म्हणाली. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथाने आजवर तिच्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलेलं नाही. तसचं ती या विषयावर बोलणं टाळताना दिसते. त्यामुळे ‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोमध्ये समांथाने वैवाहिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल काही खुलासा केलाय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिनेश विजन निर्मित सिनेमात समांथा झळकणार असल्याचं म्हंटलं जातंय. असं असलं तरी फिल्म मेकर्स आणि समांथाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या वर्षाअखेरीस सिनेमाचं शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे, तर २०२३ सालामध्ये सिनेमा रिलीज होईल. समांथाने एकच नव्हे तर दुसराही हिंदी सिनेमा साइन केलाय. हा सिनेमा करण जोहर प्रोड्यूस करणार असून अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.