बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या रिलेशनशिपबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या. जवळपास दोन वर्षांनंतर साराने याबाबत खुलासा केला आहे. २०२० मध्ये ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सारा-आर्यनमध्ये जवळीक वाढली. ‘कॉफी विथ करण ७’च्या एपिसोडमध्ये साराने अखेर याबाबत सांगितलं आहे. यावेळी करणने कार्तिकचे नाव न घेता साराच्या लव्ह लाइफबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा – कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या जान्हवी-सारा? करण जोहरचा मोठा खुलासा

करणने साराला कार्तिक आर्यनविषयी विचारलं. “याआधी जेव्हा तू शोमध्ये सहभागी झाली होती तेव्हा कार्तिक आर्यनबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्याची इच्छा तू व्यक्त केली होती.” असे करण म्हणाला. यावर होकार देत सारा म्हणाली, “होय. मात्र, त्याच शोदरम्यान साराने असेही सांगितले की तिला आता विजय देवराकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये यायचे आहे. एवढंच नाही तर साराने रणवीर सिंगचंही नाव घेतलं.” यावर करण म्हणाला, तो विवाहित आहे, तर सारा म्हणाली की काय फरक पडतो. क्रश म्हणजे क्रश.”

दरम्यान, कार्तिक-सारा विभक्त होण्यामागचं कारण साराची आई म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग असल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि कार्तिकची जवळीक वाढल्याचे अमृता यांना आवडलं नाही. कार्तिक ज्या अभिनेत्रीसोबत चित्रपट करतो तिच्या सोबत कार्तिकचे नाव जोडलं जातं. ही गोष्ट अमृता यांना खटकली. यामुळेच कार्तिक-साराने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – रोहमन आणि ललित मोदी यांना एकत्रच डेट करत होती सुष्मिता? एक्स बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कॉफी विथ करण ६’मध्ये काय म्हणाली होती सारा…
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या रिलेशनशिपची चर्चा ‘कॉफी विथ करण ६’ पासून सुरू झाली. यावेळी साराने तिचे वडील सैफ अली खानसोबत शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये रॅपिड फायर राउंड दरम्यान, जेव्हा करणने साराला तिला बॉलीवूडमधील कोणत्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये यायला आवडेल असे विचारलं. तेव्हा साराने कार्तिक आर्यन असे लगेच उत्तर दिलं. यानंतर ते दोघे ‘लव्ह आज कल’ चित्रपटात एकत्र दिसले. या चित्रपटापासूनच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. मात्र, दोघांनीही यावर कधीच जाहीरपणे काहीही सांगितलं नाही.