अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १७’ हा शो सध्या चर्चेत आहे. या शोने असंख्य लोकांना श्रीमंत बनवले आहे. अलीकडेच ‘कांतारा’चा दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टी केबीसीमध्ये आला होता. नवीनतम भागात कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर दिसले. शोचा एक मजेदार प्रोमो रिलीज झाला आहे. या दोन्ही कॉमेडियननी त्यांच्या विनोदी भाषणाने बिग बींना हसवले.
सोनी टीव्हीने ‘कौन बनेगा करोडपती १७’चा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये तुम्हाला दिसेल की, केबीसीच्या सेटवर हास्याचे वातावरण आहे. प्रोमोमध्ये सुनील पूर्णपणे बिग बींच्या केबीसी गेटअपमध्ये दिसत आहे. दुसऱ्या प्रोमोमध्ये पांढरा सूट घातलेला आणि क्लीन-शेव्ह केलेला सुनील त्याचे मजेदार गाणे ‘मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते’ गातो. त्याची स्टाईल पाहून अमिताभ बच्चन हसायला लागतात.
कृष्णा अभिषेकने बिग बींना ‘हा’ प्रश्न विचारला
कृष्णा अभिषेक ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वेशभूषेत आला. तो अमिताभ बच्चन यांना म्हणाला, “तुम्ही या गेटअपमध्ये चांगले दिसता. तुम्हाला यासाठी किती पैसे दिले आहेत. तुम्ही किती पैसे घेता?” असे त्याने विचारले. कृष्णा सुनीलबद्दल विनोद करण्यापासून मागे हटला नाही. तो म्हणाला, “येथे मी त्याला भाऊ म्हणतो, नाही तर, आमच्या शोमध्ये आम्ही दर आठवड्याला बहिणी आहोत.” हे ऐकून बिग बी हसू लागले.
केबीसीबद्दल बोलायचे झाले, तर हा क्विझ गेम शो २००० मध्ये सुरू झाला आणि सध्या त्याचा १७ वा सीझन सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी १६ सीझन होस्ट केले आहेत; तर शाहरुख खानने एक सीझन होस्ट केला आहे. केबीसी १७ चा प्रीमियर ऑगस्टमध्ये झाला आणि सोमवार ते शुक्रवारदरम्यान रात्री ९ वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो. तुम्ही सोनी लिव्हवर नवीन एपिसोडदेखील पाहू शकता.
चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर अमिताभ शेवटचे दक्षिणेतील स्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘वेट्टाय्यान’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. पुढे बिग बी अभिषेक बॅनर्जी आणि डायना पेंटी यांच्याबरोबर ‘सेक्शन ८४’ या कोर्टरूम ड्रामामध्ये दिसतील. त्याव्यतिरिक्त ते फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’मध्ये त्यांच्या दमदार आवाजाने कथावाचक भूमिका साकारणार आहेत.