महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शिवानीने शीतलची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानीने साकारलेले शितली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. सिनेसृष्टीत कायमच चर्चेत असलेली शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. नुकतंच शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचा एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवानीने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शिवानी बावकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशालीने गायलेल्या ‘खो गयी मैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात तिने जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी शिवानीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्लाझो परिधान केला आहे. ती या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या डान्स मूव्हचे आणि सौंदर्याचे कौतुक करत आहे. यावर नेटकऱ्यांनी फायर, हार्ट यासारख्या इमोजींचा पाऊस पाहायला मिळत आहे.

शिवानी बावकर ही सध्या ‘कुसुम’ या मराठी मालिकेत काम करत आहे. ही मालिका सोनी मराठीवर प्रक्षेपित होते. यात शिवानीची भूमिका प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा अभिनयाचे चाहते फारच कौतुक करताना दिसत आहे.

“हे तुला शोभत नाही”, इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ रिल व्हिडीओमुळे वहिनीसाहेब ट्रोल

शिवानी ही ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शीतलीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेतील शीतलीचा अंदाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेतील अज्या आणि शीतलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. देशासाठी जीवाची बाजी लावणारा फौजी आणि त्याच्या स्वप्नाला आपलं स्वप्न समजणारी शीतली अशी ही कथा प्रेक्षकांना फारच आवडली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagir zal ji serial fame actress shivani baokar shared new reel video on instagram nrp
First published on: 07-01-2022 at 17:52 IST