बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लारा दत्ताने अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. लारा दत्ताने तिच्या १९ वर्षाच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत सलमान खानपासून अक्षय कुमार गोविंदा यासह विविध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे या सर्व कलाकारांच्या अनेक गुपित, त्यांच्या सवयी यांची लाराला माहिती आहे. नुकतंच याबाबत तिने खुलासा केला.

लारा दत्ता सध्या तिच्या ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच या शोबाबत तिने ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाईटशी संवाद साधला. यावेळी तिला हा वेब शो कशावर आधारित आहे? त्यात नवीन काय पाहायला मिळणार आहे? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.

‘तू आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहेस, मग त्यांच्या अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या आतापर्यंत बदललेल्या नाहीत?’ असा प्रश्न लाराला यावेळी विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना लाराने सलमान खान आणि अक्षय कुमारबद्दल धक्कादायक खुलासा केला.

लारा म्हणाली की, “सलमान खान अजूनही मला मध्यरात्री फोन करतो. सलमानसोबत मी ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे जेव्हा सलमान उठतो, तेव्हाच त्याचे फोन येतात.”

“माझे बालपण मुंबईतील चाळीत गेले, पण सलमानमुळे…”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अक्षय कुमारबद्दल सांगताना लारा म्हणाली, ‘तो अजूनही खूप लवकर उठतो’. लारा दत्ताने अक्षय कुमार सोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेल्यावर्षी लारा आणि अक्षय एकत्र ‘बेल बॉटम’ चित्रपटात दिसले होते. ‘बेल बॉटम’मध्ये लारा दत्ताने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी ती ‘हिकप्स एंड हुकअप्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.