हॅरी पॉटर ही सिरीज कायमच चर्चेत आहे. हॅरी पॉटर हे नाव माहीत नसलेली व्यक्ती शोधून सापडणंही अवघड आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील प्रत्येक ठिकाणी याचे चाहते आहेत. मात्र हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅरी ऑन या सीरिजमुळे तो घराघरात पोहोचला. त्याच्या या भूमिकेला चांगली पसंती मिळाली होती. हॅरी पॉटरमधील सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनामुळे हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेते लेस्ली फिलिप्स हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला होता. काल रात्री झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एजंट जोनाथन लॉयड यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

लेस्ली फिलिप्स यांचा जन्म २० एप्रिल १९२४ रोजी लंडन येथे झाला आहे. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर लेस्ली फिलिप्स यांनी ‘डॉक्टर इन द हाऊस’, टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.

लेस्ली फिलिप्स यांनी ८० वर्षांपेक्षा जास्त काळ सिनेसृष्टीत काम केले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक चित्रपट, टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्ये काम केलं आहे. २००६ च्या व्हीनस चित्रपटात पीटर ओ टोल बरोबरच्या त्यांच्या सहाय्यक कामगिरीबद्दल त्याला बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘एम्पायर ऑफ द सन’ आणि सिडनी पोपच्या ‘आउट ऑफ आफ्रिका’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला आफ्टर डेथ हा लेस्ली फिलिप्स यांचा शेवटचा चित्रपट होता.