Madhuri Dixit and Urmila Matondkar Dance Video : अभिनेत्री शबाना आझमी यांनी १८ सप्टेंबर रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. त्यांच्या पार्टीला बॉलीवूडमधील त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
शबाना यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवस जरी शबाना यांचा असला तरी माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर या दोन अभिनेत्रींनी लक्ष वेधून घेतलं. त्या दोघींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांनी ‘रंगीला’ मधील ‘याई रे याई रे’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी माधुरीने लाल रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता. उर्मिला मातोंडकरने सोनेरी आणि काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला होता. या दोघींचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत. “मराठी मुली”, “खूपच सुंदर डान्स केला तुम्ही”, “डान्सिंग क्वीन्स” अशा कमेंट्स त्यांच्या व्हिडीओवर केल्या आहेत.
पार्टीत आधी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी रोमँटिक डान्स केला. दोघांनी ‘प्रिटी लिटील बेबी…’ या गाण्यावर डान्स केला. या कपलचं सगळ्यांची कौतुक केलं. फरहान अख्तरदेखील आपल्या आई-वडिलांचा रोमँटिक डान्स एन्जॉय करताना दिसला. आपल्या फोनमध्ये त्याने हे क्षण कैद केले. शबाना आझमी यांचा डान्स झाल्यानंतर विद्या बालन, रेखा, माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांनी ‘परिणीता’ मधील ‘कैसी पहेली जिंदगानी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा व्हिडीओ फराह खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये फराह खानने लिहिले आहे, “तुम्ही आता ७५ वर्षांच्या झाल्या आहात. शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव करो की तुम्ही दोघं नेहमी असेच तरुण राहा.”