छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार आता नवनवीन नाटकात, चित्रपटात पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकारांचं नवंकोर नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ‘थेट तुमच्या घरातून’ असं या नाटकाचं नाव असून लेखन, दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलं आहे. या नाटकात भक्ती देसाई व्यतिरिक्त हास्यजत्रेतले कलाकार आहेत. पण, प्रसादच्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकातून शिवाली परबची काही दिवसांपूर्वी एक्झिट झाली आहे.

‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात स्वतः प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर आणि भक्ती देसाई आहे. २१ डिसेंबर २०२४पासून सुरू झालेल्या या नाटकात शिवाली परब देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होती. तिचं हे पहिलं-वहिलं नाटक होतं. पण अचानक शिवालीने काही दिवसांपूर्वी प्रसादच्या या नाटकाला रामराम केला. ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाच्या पोस्टरमध्ये शिवालीच्या जागी नवा चेहरा पाहायला मिळत आहे. शिवालीच्या जागा आता ‘बालक-पालक’ चित्रपटात झळकलेली भाग्यश्री मिलिंद घेतली आहे.

प्रसाद खांडेकरने ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाचं पोस्टर शेअर केलं आहे. “नाती छान मुरलेली असली की त्यात नकळत मजा यायला लागते! अशाच एका धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट…’थेट तुमच्या घरातून’,” असं कॅप्शन लिहित प्रसादने नाटकाचं पोस्टर शेअर केलं असून ज्यामध्ये शिवालीच्या जागी ओंकार राऊतसह भाग्यश्री मिलिंद दिसत आहे. एप्रिल महिन्यापासून ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकात शिवालीच्या जागी भाग्यश्री पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाग्यश्री मिलिंदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. ‘बालक-पालक’, ‘उबुंटू’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘आनंदी गोपाळ’, ‘अथांग’ या चित्रपटांमध्ये भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. तसंच तिने गुजराती नाटकात काम केलं आहे. ‘अनन्या’ या लोकप्रिय नाटक गुजराती भाषेत केलं होतं, ज्यामध्ये भाग्यश्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.