scorecardresearch

“समीरराव आमचे डुकराचं पिल्लू…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम शेफालीने घेतला हटके उखाणा

नुकतंच ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर काही पाहुण्यांनी मिळून समीर आणि शेफाली यांचं लग्न लावून दिलं.

majhi tujhi reshimagath sameer shefali

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेमध्ये नुकतंच नेहा आणि यशचे लग्न पार पडलं. नुकतंच ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर काही पाहुण्यांनी मिळून समीर आणि शेफाली यांचं लग्न लावून दिलं. त्यावेळी समीर आणि शेफालीने एकमेकांसाठी खास उखाणाही घेतला.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत संकर्षण कऱ्हाडे हा समीरची भूमिका साकारत आहे. नुकतंच किचन कल्लाकारच्या मंचावर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेफाली म्हणजे अभिनेत्री काजल काटे सहभागी झाली होती. यावेळी किचन कल्लाकारच्या मंचावर अनेक गंमतीजमती पाहायला मिळाल्या. यावेळी या मंचावरील उपस्थितांनी समीर-शेफाली यांचे लग्नही लावून दिले. यानंतर संकर्षण कऱ्हाडेला शेफालीसाठी खास उखाणा घेण्यासही सांगितले. याचा एक व्हिडीओ झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेता घेणार तब्बल २१ दिवसांसाठी ब्रेक, कारण आले समोर

यावेळी उखाणा घेताना समीर म्हणाला, “तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाने माझी ही काय अवस्था झाली, मला वाटलं मिळेल एखादी नेहासारखी पण मिळाली शेफाली”. तर शेफालीनेही समीरसाठी एक जबरदस्त उखाणा घेतला. “मोगऱ्याचं फुल हलत कसं डुलुडुलु, समीरराव आमचे डुकराचं पिल्लू” असा अफलातून उखाणाही शेफालीने घेतला.

यानंतर या दोघांनी रोमँटिक गाण्यावर डान्सही केला. याबाबतचा एक व्हिडीओही झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानच्या सेटवर अचानक पोहोचला शाहरुख, दोघांमधील वाढत्या मैत्रीचा व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत आता समीर आणि शेफालीचा रोमँटिक ट्रॅक लवकरच पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे सध्या नेहा आणि यशचा संसार खुलू लागला आहे. मात्र सिम्मी काकू आणि नेहाचा पहिला पती हे काही ना काही कटकारस्थान करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Majhi tujhi reshimagaath sameer shefali ukhana kitchan kallakar video viral nrp

ताज्या बातम्या