अभिनेता चंकी पांडे गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहे. सोमवारी त्याने कुटुंबियांसह ६० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसापूर्वी त्याने जवळच्या मित्रांसाठी प्री-बर्थ डे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाईफ्स २’ या नेटफ्लिक्स सीरिजच्या काही भागांमध्ये चंकी पांडे दिसला होता. या शोमध्ये त्याची पत्नी भावना पांडे प्रमुख भूमिकेत आहे.

त्याने ‘आगही आग’ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. ‘तेजाब’ या चित्रपटामध्ये त्याने बबन हे पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट सहायक अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता. त्याने ‘पाप की दुनिया’, ‘खतरो के खिलाडी’, ‘घर का चिराग’, ‘विश्वात्मा’, ‘आंखे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये सहायक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याने ‘साहो’, ‘प्रस्थानम’ आणि ‘बेगम जान’ या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत.

आणखी वाचा – अजय देवगणला येतेय दृश्यमची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीला सलमान खान, करन जोहर, संजय कपूर, अनिल कपूर, आर्यन खान असे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी त्याला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान फराह खान, मलाईका अरोरा आणि एकता कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे चंकी पांडे चर्चेत आला आहे. या तिघींनीही तरुणपणी त्यांना चंकीवर क्रश असल्याची कबूली दिली. दिग्दर्शिका फराह खानने त्याच्यासह फोटो टाकत त्यावर ‘पती पत्नी आणि भावना पांडे, हे आपलं भविष्य असू शकलं असतं’ असे लिहिले आहे. ‘काही वर्षापूर्वी मी तुझ्याकडे पाहून हसले होते. जर तेव्हा तू प्रतिसाद दिला असतास, तर आज मी बॉलिवूड वाईफ असते’ असे एकता कपूरने म्हटले आहे.

आणखी वाचा – “त्यावेळी दिग्दर्शकाने…” आशा पारेख यांनी सांगितले सिनेसृष्टी सोडण्यामागचे खरे कारण

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. त्यांनी ‘लायगर’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.