अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळु तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला. मराठीसोबतच सईने हिंदीत देखील ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंमुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र गेल्या काही काळापासून सई मराठी चित्रपटात फार कमी दिसते. या मागचे खरे कारण काय आहे? याबाबत सईने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ या वृताशी संवाद साधताना सईला मराठी इंडस्ट्रीमधून हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाण्यामागचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी तिने सांगितले की, “तुमच्या कारकीर्दीत अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. तसंच  मला ही एक कलाकार म्हणून नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता. हा नवीन अनुभव घेतल्याने तुमच्या मनाला आनंद मिळतो. मला प्रत्येक प्रोजेक्टसह नवीन टीमसोबत काम करायला आवडते. यामुळे मला खूप उभारी मिळते. तसंच हिंदी चित्रपटसृष्टीने मला स्वतःला पारखण्याची संधी दिली आणि या कारणामुळे मी हिंदी चित्रपटांकडे वळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सई ताम्हणकरने नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘मीमी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. यात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसले होते. यांचा हा चित्रपट टेलिग्रामवर लीक झाल्याने ठरलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला होता.