मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ती नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. सई ही लवकरच ‘पेर पुराण’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या निमित्ताने नुकतंच तिने एक हटके फोटो शेअर केला आहे.

सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सईने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट आगामी पेट पुराण या वेबसीरीजची आहे. या पोस्टमध्ये तिने एका मांजरीचा फोटो शेअर केला आहे. यात ती मांजर झोपली असून तिचे नाक दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.

Video : ‘तारक मेहता…’ मधील दयाबेनचा मिनी स्कर्ट आणि बॅकलेस टॉपमध्ये हटके डान्स, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क

‘माझी pink नाकाची सुंदरी ! बकूळा aka बकू !!’, असे सई या फोटोला कॅप्शन देताना म्हणाली. सईचा हा फोटो आणि तिची कॅप्शन सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी त्यावर हार्ट, स्माईल, असे विविध इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान ‘पेट पुराण’ ही वेबसीरिज आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्याक्रमामधील संघर्षाना दाखवते. ज्या जोडप्याला मुलं नको असतं. त्यांचा या सगळ्याकडे एक वेगळा दृष्टीकोन असतो. मग ते प्राणी पाळण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर ते कशा प्रकारे त्या प्राण्यांना पाळतात याची कथा तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे.

अभिनेते किरण मानेंनी शेअर केला नागराज मंजुळेंसोबतचा खास फोटो, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी लिव्हवर ६ मे पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. ‘पेट पुराण’ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. #पेटपुराण मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल.