मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच तिच्या या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे.

सोनाली कुलकर्णीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना याबद्दलची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता तिने इस्टरच्या निमित्ताने तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिली मोठी गुडन्यूज, ट्वीट करत म्हणाली…

सोनालीने शेअर केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये डोंगर-दऱ्या, नदी, झाडं-झुडूप दिसत आहेत. त्याबरोबर यात पावलांचे तीन ठसेही पाहायला मिळत आहे. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे. हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिच्या नव्या चित्रपटासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.