‘झी टीव्ही’वरील ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिकेला कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेतील मानव-अर्चना ची जोडी हिट ठरली होती. याच मालिकेतील मानवच्या भूमिकेने सुशांत सिंग राजपूतला घराघरात पोहोचवलं होतं. या मालिकेत अर्चनाची सासू सविता ताई ही भूमिका अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारली होती. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. या मालिकेचा पहिला भाग २००९ दरम्यान प्रदर्शित झाला होता. नुकतंच उषा नाडकर्णींनी या मालिकेच्या शूटींगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान उषा नाडकर्णींनी पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : “त्या काळी पुरुष अभिनेते…” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?

“आम्ही पवित्र रिश्ता करत होतो. त्यावेळी रात्री दीड-पावणे दोन दरम्यान शूटींग सुरु होतं. यात रात्री आमच्या दुसऱ्या मुलाचे निधन होते, त्याचा अस्थीकलश बाप घेऊन येतो, या एका सीनचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी मला दिग्दर्शकाने हा अस्थीकलश तुम्ही धरायचा, असे सांगितले होते. त्यावेळी मी दिग्दर्शकाला विचारले, जिच्या मुलाचे निधन झाले आहे, त्याच्या अस्थी आई उचलणार? असं कोण करतं? आमच्यात असं करत नाही. त्यामुळे मी हा सीन करणार नाही.

त्यावेळी मी खुर्चीत बसून राहिले. त्यानंतर दिग्दर्शकांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी मला तुम्ही बरोबर आहात असे सांगितले. त्यानंतर तो सीन चित्रीत झाला. काहीही वाटेल ते… मुलाचा अस्थीकलश आई धरते. बेअक्कल असल्यासारखे करतात. एकतर पूर्ण माहिती असावं नाहीतर अडाणी असावं. हे असं मधलं नको”, असे उषा नाडकर्णींनी म्हटले.

https://fb.watch/fyjEi48Peu/

आणखी वाचा : “मोठ्या नट्या…” उषा नाडकर्णींनी नवोदित येणाऱ्या अभिनेत्रींचे टोचले कान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.