अभिनेता वैभव तत्त्ववादी हा मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. तर आता त्याने शाळेतल्या क्रशबद्दल खुलासा केला आहे.

वैभव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर सक्रिय राहून आणि विविध मुलाखतींमधून तो त्याच्या कामाबद्दल आणि त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत असतो. आता तो लहान असताना शाळेतल्या एका शिक्षिकेवर त्याला क्रश होता असं त्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा : वैभव तत्त्ववादीने लग्न करण्याबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मला जे विचारतात…”

‘लोकमत फिल्मी’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझं शाळेतलं पहिलं क्रश माझ्या केजीमधल्या शिक्षिका होत्या आणि हे सगळ्यांना माहीत आहे. माझ्या आई-बाबांना आणि त्या बाईंनाही हे माहीत आहे. त्या शिक्षिकाच म्हणायच्या की वैभव माझ्या खूप मोठा चाहता आहे. त्या यायच्या नाहीत त्या दिवशी मी रडायचो.”

हेही वाचा : “ती कायमच माझ्यासाठी…” प्रार्थना बेहेरेबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर वैभव तत्त्ववादी स्पष्टच बोलला

आता वैभवचं हे बोलणं चर्चेत आलं आहे. त्याचा हा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडला असून आता त्यावर सगळेजण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.