scorecardresearch

वैभव तत्त्ववादीने लग्न करण्याबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मला जे विचारतात…”

अनेकदा त्याला “लग्न कधी करणार?” हा प्रश्न विचारला जातो. आता यावर त्याने खुलेपणाने भाष्य केलं आहे.

vaibhav tatwawadi

अभिनेता वैभव तत्त्ववादी हा मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. अनेकदा त्याला “लग्न कधी करणार?” हा प्रश्न विचारला जातो. आता यावर त्याने खुलेपणाने भाष्य केलं आहे.

वैभव सध्या त्याच्या आगामी ‘सर्किट’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा लुक या चित्रपटाचा ट्रेलर शिक्षकांना खूप आवडला. त्यामुळे आता सर्वजण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. सध्या वैभव या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याच निमित्ताने त्याने ‘सकाळ’ला एक मुलाखत दिली.

आणखी वाचा : “‘कान्हा’ चित्रपटाच्यावेळी वैभव तत्त्ववादी…” अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यावेळी त्याला “लग्नाबद्दल तुला अनेकदा प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा तुला राग येतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना वैभव म्हणाला, “नाही मला त्याचा राग येत नाही. मला जे लोक विचारतात तेच स्वतःच्या आयुष्यात किंवा लग्नात इतके दु:खी असतात की मग ते इतरांना सांगतात की तुम्ही करू हे नका…”

हेही वाचा : किसिंग सीन, अ‍ॅक्शन अन…; ऋता दुर्गुळे व वैभव तत्त्ववादीच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

वैभवचं हे गमतीशीर उत्तर आता खूप चर्चेत आलं आहे. दरम्यान त्याच्या या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती दोघं पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. हा त्यांचा आगामी चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 18:57 IST

संबंधित बातम्या