मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं आवडतं. काही महिन्यांपूर्वीच अमृताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. अमृताच्या मावशीचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. मावशीसाठी तिने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली. आता पुन्हा एकदा अमृता मावशीच्या आठवणीमध्ये भावूक झाली आहे.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

सायली संजीवची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अमृता तिच्या मावशीबाबत बोलताना भावूक झाली.

“माझ्या कपाटामध्ये तुम्हाला अधिक पैठण्याच दिसतील. कुठल्या स्त्रीसाठी तिच्या पैठणींमागे खास आठवणी असतात. आज माझी मावशी आमच्याबरोबर नाही. पहिल्या सीनमध्ये जेव्हा सायली पैठणी नेसून येते तेव्हा मला माझ्या मावशीची आठवण आली. कारण तिला मी जी पैठणी गिफ्ट म्हणून दिली होती ती सायलीने चित्रपटामध्ये नेसल्याप्रमाणेच होती.” असं अमृता ‘मज्जा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली.

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या घरी सत्यनारायणाची पूजा, नवविवाहित जोडप्याच्या साधेपणाची व्हिडीओमध्ये दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही अमृताने तिच्या मावशीचे फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. “तू फक्त माझी मावशीच नाही तर आई सुद्धा होती. तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या, कठीण टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून तुझ्या कुटुंबासाठी संघर्ष करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली.” अशी भावूक पोस्ट अमृताने मावशीच्या निधनानंतर शेअर केली होती.