मराठी लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे मानसी नाईक. आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. आता या घरात जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या शुभ मुहूर्तावर मानसी नाईकने नवीन घर खरेदी केले आहे. या घरात पूजा करतानाचा आणि गृहप्रवेशाचा एक व्हिडीओ मानसीने दोन दिवसांपूर्वी शेअर केला होता.
आणखी वाचा : Video : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मानसी नाईकने खरेदी केले नवीन घर, म्हणाली “या रखरखीच्या जगण्यात वावरताना…”

त्यानंतर आता मानसीने तिच्या घरातील आणखी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओत मानसी ही स्वयंपाकघरात पुरी करताना त्या तळताना दिसत आहे. त्याबरोबरच ती खीर बनवल्याची झलकही दाखवताना पाहायला मिळत आहे. यावेळी ती फारच आनंदात आणि उत्साहात दिसत आहे.

“मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं, कधी कधी मुली तुमच्याकडे बघून पण हसतात”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ‘याचा अर्थ मानसीला जेवण बनवता येते’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एकाने “अशी बनवणारी असेल तर मी जळलेल्या पुऱ्या सुद्धा चवीने खाईन..” अशी कमेंट केली आहे.

मानसी नाईकच्या पोस्टवरील कमेंट

आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा

तर एकाने “स्वतःच्या मेहनतीच्या घरात राहण्यात जो आनंद आहे, तो बापाच्या आयत्या घरात राहण्यात कुठे…!!!! नवीन घराबद्दल खूप-खूप अभिनंदन…”, अशी कमेंट केली आहे. “सर्वगुण संपन्न”, अशी कमेंट एकाने मानसीच्या व्हिडीओखाली केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मानसी नाईक अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली होती. मानसीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती घराबाहेर कलशाची पूजा करताना दिसत आहे. तसेच ती नव्या घराच्या दरवाजावर ‘श्री’ असे लिहितानाही दिसत आहे. यानंतर ती पूजा करताना दिसली होती.