actress manasi naik shared post after divorce news said dont play with girls seeking attention | Loksatta

“मुलींबरोबर खेळू नका…” घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान केलेली पोस्ट चर्चेत

“मुलींबरोबर खेळू नका…” घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मानसी नाईकने केलेली पोस्ट चर्चेत आहे. (फोटो: मानसी नाईक/ इन्स्टाग्राम)

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक पतीसह विभक्त होणार असल्यामुळे चर्चेत आहेत. मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी मानसीने याबाबत उघडपणे भाष्य करत घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं सांगतिलं.

प्रदीप खरेरापासून वेगळं होणाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता मानसी नाईकने केलेली पोस्ट चर्चेत आहे. मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Dishyam 2 Box Office Collection: अजय देवगणचा ‘दृश्यम २’ सुपरहिट, पार केला १०० कोटींचा आकडा

मानसीने “अशा मुलींबरोबर खेळू नका, ज्या तुमच्यापेक्षा चांगलं खेळू शकतात” अशा आशयाचं कॅप्शन फोटोला दिलं आहे. मानसीच्या या पोस्टचा संदर्भ तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला जात आहे.

हेही वाचा>> Video: आधी धक्का दिला, मग जोरात ढकललं; विकास सावंत व रोहित शिंदेमध्ये हाणामारी; बिग बॉसने सुनावली जेलमध्ये राहण्याची शिक्षा

हेही वाचा>> Video: भारती सिंगसह राकेश रोशन यांचा रोमॅंटिक गाण्यावर डान्स, हृतिक रोशन व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मानसी नाईक १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरासह विवाहबंधनात अडकली होती. बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या प्रदीपसह मानसीचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झल्या होत्या. लग्नाच्या दोन वर्षांच्या आतच मानसी नाईक व प्रदीप खरेरा विभक्त होत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 11:06 IST
Next Story
“मराठी माणसाने कष्टाचे पैसे…” जितेंद्र जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत