Sai Tamhankar Mother Reaction : अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील लावणीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लावणी केली आहे. या गाण्याचं नाव आहे ‘आलेच मी’.

सध्या सईच्या या लावणीवर सिनेविश्वातील बरेच सेलिब्रिटी रील्स व्हिडीओ बनवून ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. सईच्या नृत्यशैलीचं सर्व स्तरांतून कौतुक होत असताना, ही लावणी पाहून तिच्या आईची प्रतिक्रिया काय आहे? याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच ‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ‘वजनदार’ अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. सईचे हावभाव, तिच्या अदा व नृत्य सगळंच जबरदस्त आहे. या लावणीसाठी सईने तब्बल ३३ तास सराव केला होता. लेकीची लावणी पाहून तिची आई काय म्हणाली जाणून घेऊयात…

सईने पहिल्यांदाच सादर केलेली लावणी पाहून तिची आई मृणालिनी ताम्हणकर फारच आनंदी झाल्या आहेत. याशिवाय सई येत्या काळात अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अभिनेत्री म्हणाली, “माझी सगळीच कामं पाहून आई सध्या सुखावली आहे. तिला खूप बरं वाटतंय. आपण आपल्या पालकरांच्या चेहऱ्यावर ते एक समाधान पाहतो तेव्हा आपल्यालाच छान वाटतं अगदी तसंच मला आता वाटतंय. प्रत्येक आईच्या नजरेच आपलं मूल हे शाहरुख खान असतं. अगदी त्याचप्रमाणे माझ्या आईच्या नजरेत सुद्धा मी शाहरुख खान आहे.”

“लावणी पाहून आई म्हणाली, ‘काय गं किती छान… तू काहीही करू शकतेस’ मला माहितीये. हे जे तिचं म्हणणं आहे ना ते मला फार कमी वेळेला ऐकायला मिळतं आणि लावणीनंतर मला हे ऐकायला मिळालं. तिची प्रतिक्रिया हीच माझ्या कामाची सर्वात मोठी पोचपावती आहे.” असं सई ताम्हणकरने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Luv Films (@luv_films)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सई पुढे म्हणाली, “देवमाणूस’मध्ये लावणी सादर करणं हा माझ्यासाठी सुद्धा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणं ऐकताच माझे पाय थिरकायला लागले होते. कोरिओग्राफर आशीष पाटीलच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती.”