मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हिचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या या संपूर्ण करिअरमध्ये तिला भक्कम साथ मिळाली ती तिच्या आईची. आता सईने नुकताच तिच्या आणि तिच्या आईच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

सई ताम्हणकर आणि तिच्या आईचं नातं खूप खास आहे. अनेक पुरस्कर समारंभांमध्ये त्या एकत्र दिसत असतात. आतापर्यंत अनेक वेळा सई तिच्या आईबद्दल विविध मुलाखतींमधून भरभरून बोलली आहे. तर आता तिने त्या दोघींच्या नात्यांमधील एक गुपित उघड केलं. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या दोघी सहा महिने एकत्र राहतात आणि सहा महिने वेगळ्या राहतात, असं सांगत तिने त्यामागचं कारण सांगितलं.

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

सई म्हणाली, “मी आम्हा दोघींनाही तलवारीची उपमा देईन. एका म्यानात जशा दोन तलवारी एकत्र राहू शकत नाहीत, तशाच आम्हीही आहोत. आम्ही वर्षातून सहा महिने एकत्र असतो. त्यानंतर आम्ही सहा महिने वेगवेगळं राहतो. पण या तलवारींनी लढलेल्या लढाया आणि त्यांचा प्रवास हा माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. अनेक लढाया जिंकून आम्ही आज इथवर पोहोचलो आहोत.”

हेही वाचा : “सई ताम्हणकर खूप बोल्ड, तर प्राजक्ता माळी…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा अभिनेत्रींबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सई ताम्हणकर आगामी काळात उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दिसणार आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तिच्या या आगामी चित्रपटांकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.