मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची ओळख आहे. सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती कोठारे व्हिजन्सने केली आहे. आता लवकरच आदिनाथ ‘शक्तिमान’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो केवळ एक अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरांत प्रसिद्ध आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथने कुटुंबावर आलेल्या एका कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

आदिनाथ सांगतो, “मी आज तुम्हाला एक किस्सा सांगतो खरंतर, आताच त्यांचं (महेश कोठारे) एक पुस्तक आलंय ‘डॅम इट आणि बरंच काही’ त्यामध्ये सुद्धा त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. माझं तेव्हा नुकतंच TY ( पदवीचं तृतीय वर्ष ) पूर्ण झालं होतं आणि मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं. त्यावेळी घरात परिस्थिती खूप वाईट होती. कारण, माझ्या वडिलांचे तेव्हा दोन सिनेमे चालले नव्हते. त्यावेळी कोल्हापूरला ‘खबरदार’ चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. मी तेव्हा जेमतेम २०-२१ वर्षांचा असेन आणि त्यावेळी ‘खबरदार’ चित्रपटासाठी मी वडिलांकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो.”

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनची घोषणा! महेश मांजरेकरांच्या जागी दिसणार ‘हा’ मराठमोळा बॉलीवूड सुपरस्टार

आदिनाथ पुढे म्हणाला, “त्यावेळी आमच्यावर खूप मोठं कर्ज होतं. घरी सगळा गोंधळ चालू होता. पण, त्यावेळी आम्ही दोघंही पूर्णपणे आणि अगदी मनापासून ‘खबरदार’ चित्रपटासाठी काम करत होतो आणि असंच एकदा शूटिंग चालू असताना बँकेने आमचं मुंबईतलं घर सील केलं आणि ते घर जप्त केल्यामुळे आमच्याकडे मुंबईत घरच नव्हतं.”

हेही वाचा : “त्या दिवसानंतर मी प्रत्येकाबरोबर फोटो काढते”, अश्विनी महांगडेने सांगितली खास आठवण; नेमकं काय घडलं?

“मला आणि माझ्या आजी-आजोबांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. तरीही या सगळ्यात त्यांनी शूटिंगचं सगळं शेड्यूल संपवलं. माझ्या वडिलांनी आणि आईने कोणाला काहीच कळू दिलं नाही. शूटिंग संपल्यावर मी आणि आजी-आजोबा पुण्यात येऊन राहिलो. तर, दुसरीकडे माझे आई-वडील मुंबईत येऊन घर शोधत होते. त्यानंतर २००५ मध्ये आम्ही कांदिवलीला शिफ्ट झालो. त्या परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला पुढचं शिक्षण मिळावं यासाठी कर्ज घेतलं. त्यांचं एकच म्हणणं होतं की, याचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर, माझ्या आयुष्यात खरे ‘शक्तिमान’ माझे आई-वडील दोघंही आहेत” असं आदिनाथ कोठारेने सांगितलं.

हेही वाचा : Video : ‘मुरांबा’ फेम सुलेखा तळवलकरांनी घेतली नवीन गाडी! म्हणाल्या, “कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शक्तिमान’ चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना स्पृहा जोशी आणि आदिनाथ कोठारे यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.