मराठी मनोरंजसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही अमृताने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आज अमृताचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता प्रसाद ओकने अमृताच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअऱ केली आहे.

हेही वाचा- Amruta Khanvilkar Birthday: मुंबईचा जन्म पण वडिलांच्या ‘त्या’ निर्णयामुळे पुणेकर झाली अमृता खानविलकर, वाचा तिचा अभिनयसृष्टीतील प्रवास

प्रसाद ओकने आपल्या इन्स्टाग्रामवर अमृताबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत प्रसादने लिहिले, “प्रिय अमृता…असे क्षण तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत… ( म्हणून मुद्दाम हा तुझा आवडता फोटो टाकतोय ) कायम अशीच प्रसन्न, हसतमुख राहा. तुझ्या सगळ्या इच्छा-आकांक्षा देव पूर्ण करो हीच प्रार्थना! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! खूप खूप खूप प्रेम…!!!” प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करीत अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताच्या कामबद्दल बोलायचे झाले तर अमृताने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘नटरंग’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सतरंगी रे’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘बाजी’ चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात अमृताने साकारलेली ‘चंद्रा’ ही भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाणीही सुपहिट ठरली.

हेही वाचा- लाडक्या बायकोला २३ दिवस २३ गिफ्ट्स! अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त पती हिमांशू मल्होत्राची खास पोस्ट; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटांबरोबर अमृताने रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. ‘नच बलिये’च्या सातव्या पर्वाचे अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा विजेता आहेत. तसेच अमृताने झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.