‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या १० दिवसांत तब्बल २६ कोटींचा गल्ला जमावला आहे. याचे कथानक महिलांच्या दैनंदिन जीवनावर आधारलेले आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर अलीकडेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह ‘बाईपण भारी…’मधील मुख्य अभिनेत्रींनी एका मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी या अभिनेत्रींनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या महिलांच्या समस्यांवर आपले मत मांडले.

हेही वाचा : ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर प्रसाद ओकने केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिले पोस्टर आले समोर

दिग्दर्शक केदार शिंदेसह ‘बाईपण भारी देवा’च्या मुख्य अभिनेत्रींनी अलीकडेच ‘बीबीसी मराठी’च्या मुलाखतीत स्त्रियांच्या समस्यांवर भाष्य केले. महिलांच्या रजोनिवृत्तीचा काळ, मातृत्व, नैराश्य याविषयी समाजात उघडपणे चर्चा होताना दिसत नाही या समस्या पडद्यावर मांडतानाचा अनुभव कसा होता, या समस्यांबाबत तुमचे मत काय? या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या, “आजकाल पुरुष पण प्रगल्भ झाले आहेत. आपण उगाच त्यांना काहीही करता येत नाही असे समजत असतो. परंतु आता बहुतांश पुरुषांना महिलांच्या वेदना कळतात.”

हेही वाचा : “…तर शाहरुख खानने VHP आणि बजरंग दलाला १०० कोटी द्यावे”, बॉलीवूड अभिनेत्याचे ‘जवान’ चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य

वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मराठी साहित्य हे काळाच्या खूप पुढे असते. आमच्या चित्रपटाची कथा एका महिलेने लिहिली असून या विषयावर मोठ्या पडद्यावर भूमिका साकारताना आम्हाला काहीच वाटले नाही. रजोनिवृत्ती या विषयावर आम्ही एकमेकींमध्येही मोठ्याने बोलू शकतो. तसेच एक विशिष्ट मर्यादा असते ती आम्ही चित्रपट करताना राखली, याविषयी अजून मोकळेपणाने बोलायचे असते तरीही आम्ही बोललो असतो.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’मध्ये वंदना गुप्तेंनी नेसलेल्या साड्यांची ‘भारी’ गोष्ट, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा नवलकर याविषयी सांगताना पुढे म्हणाल्या, “ही कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली आहे आणि केदारसारख्या पुरुषाने याचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे महिला किंवा पुरुष असा फरक करण्यापेक्षा या विषयांबाबत आपण एक माणूस म्हणून संवेदनशील असणे जास्त महत्त्वाचे आहे.” दरम्यान ‘बाईपण भारी देवा’मध्ये रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली आहे.