सध्या राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे बोललं जात आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सर्वचजण त्रस्त झाले आहेत. नुकतंच मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केदार शिंदेंनी याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र या अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. महाराष्ट्र शाहीर असे या चित्रपटाचे नावं आहे. सध्या ते या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.
आणखी वाचा : “माझ्या सासूबाई…” आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरचे स्पष्ट उत्तर

नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर परतीच्या पावसाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी स्वत:चा फोनवर बोलतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे त्यांनी पावसाबरोबर संभाषण करत असल्याचे भासवले आहे. “हॅलो वरूणराजा.. आता बास करा की.. आधीच २ वर्षात परीस्थिती बिकट म्हणून सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय.. आणि तुम्ही रोज हजेरी लावून सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतताय.. प्रत्येक गोष्ट त्या त्या सीझनला झालेली चांगली असते. पाऊस हवाच हो.. पण तो आता या महिन्यात नको.. आणि पुढेही नको…”, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : “पण खंत एकच आहे की शिवसेनेचा…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “पण निसर्गाचं संतुलन बिघडण्यामागे कारण काय असावं ??? कुठून ना कुठून लिंक माणसालाच कनेक्ट होणार … ज्ञान-विज्ञान-विनाश”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने कमेंट करत म्हटले की ‘अगदी खरं, या अवकाळी पावसाने खूप नुकसान होतंय.’ ‘अश्यक्य ते शक्य करतील स्वामी…’ असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.