Rajeshwari Kharat Photos with Somnath Awghade : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटात शालू व जब्या या भूमिका करणारे दोन्ही कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरातने, तर जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने केली होती. राजेश्वरी व सोमनाथ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. राजेश्वरी खरातने नुकतेच सोमनाथबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, त्या फोटोला तिने दिलेले कॅप्शन चर्चेत आहे.

राजेश्वरीने सोमनाथबरोबरचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत राजेश्वरी व सोमनाथ रोमँटिक पोज देतात, दुसरा फोटो कँडिड असून तिसऱ्या फोटोत ते कॅमेऱ्याकडे बघतात. राजेश्वरीने फोटोत गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

राजेश्वरीने ‘अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं…’, असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. तसेच तिने गुलाबी रंगाचा हार्ट इमोजी वापरला आहे. राजेश्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा पोस्ट-

दादा एक नंबर जोडी, जब्याला शेवटी काळी चिमणी घावली, फँड्री २ बनवा आता, भावा कुठल्या देवाला नवस केला होतास तू, काळ्या चिमणीची कृपा, जुनं ते सोनं, कोणता तरी नवीन चित्रपट येतोय यांचा, आम्हाला पण स्वप्नच वाटतं, तुम्हाला आयुष्यभर एकत्र बघावं लागेल, तुम्ही दोघे आयुष्यभर सोबत राहून मराठी इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकार व्हावे, लोक म्हणतात चित्रपटात दाखवतात तसं काही नसतं पण हे दोघे खऱ्या आयुष्यातही जोडीदार आहेत, अशा कमेंट्स राजेश्वरीच्या या फोटोवर पाहायला मिळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rajeshwari kharat somnath awgahde romantic photos
राजेश्वरी खरातच्या पोस्टवरील कमेंट्स (स्क्रीनशॉट)

दरम्यान, राजेश्वरीने काही महिन्यांपूर्वी सोमनाथबरोबरचे लग्न मंडपातील फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर हळदीचे फोटोही शेअर केले होते. आता हे फोटो पाहून दोघेही नक्की त्यांच्या आागमी प्रोजेक्टचं शूटिंग करत आहेत की वेगळं कारण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, राजेश्वरी किंवा सोमनाथने त्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.