Marathi Actors Gharguti Ganpati Festival 2024 : ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस अखेर उजाडला आहे. आज देशभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. शिल्पा शेट्टी, नाना पाटेकर तसेच अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सवात विशेष कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं. आज अनेक मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणाची वाट धरतात. तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…म्हणत अनेक मराठी कलाकारांच्या ( Marathi Actors ) घरी आज बाप्पा विराजमान झाले आहेत.

हेही वाचा : Ganesh Festival 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला स्वत:च्या आवाजातला व्हिडीओ, गणेशोत्सवाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा!

मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे. तर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते. घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे.

marathi actor
अभिनेता स्वप्नील जोशी ( Marathi Actors )

हेही वाचा : Video: “आमचा गणोबा…”, सोनाली कुलकर्णीने भावाच्या मदतीने साकारली गणरायची सुंदर मूर्ती, नेटकरी करतायत कौतुक

Sonalee kulkarni
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Marathi Actors )

अभिनेत्री सायली संजीवने देखील घरच्या बाप्पाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

sayali sanjeev
अभिनेत्री सायली संजीव

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्याच्याबरोबर आई, पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते.

हेही वाचा : Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Amit bhanushali
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी गणरायाचं आगमन
rupali
अभिनेत्री रुपाली भोसले

रुपाली भोसले, शशांक केतकर, अंकिता लोखंडे, जुई गडकरी, सुयश टिळक, सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील सगळ्याच मालिकांमध्ये आता गणेशोत्सवाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे. मराठी कलाकारांप्रमाणे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.