दिग्दर्शक, लेखक, अभिनेता महेश मांजरेकर यांची लेक अभिनेत्री गौरी इंगवले हिने ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रीमिअरला गौरीने हजेरी लावली होती. चित्रपट संपताच गौरीचे अश्रू अनावर झाले. यादरम्यान, एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल आणि तिच्या वडिलांच्या कामाबद्दल ती भरभरून बोलली आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा गौरीला विचारण्यात आलं की, तिला हा चित्रपट कसा वाटला? यावर गौरी म्हणाली, “शब्दच नाही आहेत माझ्याकडे. मला या चित्रपटाबद्दल फारसं काही माहीत नव्हतं, कारण मला हा चित्रपट प्रीमिअरच्या दिवशी पाहायचा होता. मी बाबांना या चित्रपटाबद्दलदेखील काही विचारलं नव्हतं. ट्रेलर पाहिला त्यावेळीच मला वाटलं होतं की, मी खूप रडणार आहे.”

हेही वाचा… “सिगारेट ओढायला माझ्या वडिलांनी शिकवलं”, अभिनेत्री सुप्रिया पाठारे किस्सा सांगत म्हणाल्या…

सरांचं काम कसं वाटलं असं विचारलं असता गौरी म्हणाली, “काम बघूनच तर मी रडतेय. आज पप्पांनी खूप रडवलं. पण, चित्रपट कमाल झालाय आणि प्रत्येक मुलाने जाऊन हा चित्रपट पाहायला पाहिजे.”

चित्रपटातला लक्षात राहणारा क्षण कोणता होता? याबद्दल बोलताना गौरी म्हणाली, “चित्रपटातला एकच असा कोणता क्षण मी शोधला नाही, कारण मी संपूर्ण चित्रपटच पाहत होते. मला चित्रपट पाहताना माझ्या मम्मी- पप्पांचीपण आठवण आली.”

हेही वाचा… “…तुझी नाटकं बंद कर”, भर रेस्टॉरंटमध्ये चाहत्याशी उद्धट वागली होती काजोल; पोस्ट व्हायरल

“या चित्रपटात त्यांनी एक ओळ म्हटलीय, खऱ्या आयुष्यात आई-वडिलांना फॉलो करा; इन्स्टावर करण्यापेक्षा तेच सगळ्यांनी केलं पाहिजे”, असंही गौरी म्हणाली.

हेही वाचा… “आता मी काय करू?”, ‘ठरलं तर मग’फेम अभिनेता पडला गोंधळात; प्रेक्षकांना प्रश्न विचारत म्हणाला…

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान, गिरीश ओक, विजय निकम असे अनेक कलाकार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरी इंगवलेबाबत बोलायचं झालं तर ‘काकस्पर्श’, ‘कुटुंब’, ‘पांघरुण’ अशा अनेक चित्रपटांत गौरीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात गौरीने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात गौरीबरोबर श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत झळकला होता.