रितेश देशमुख व जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने १५ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला सुरू आहे. या मराठमोळ्या कपलकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. जिनिलीया तर मराठमोळ्या संस्कृतीच्या प्रेमात आहे.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

गेले काही वर्ष फक्त संसारात रमलेली जिनिलीया आता पुन्हा मोठ्या पडद्यावर काम करताना दिसत आहे. तिचा फिटनेस तर कमालीचा आहे. शिवाय महाराष्ट्रीयन पदार्थ खाण्याकडे ती अधिकाधिक भर देते. याबाबतच तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये भाष्य केलं.

पाहा व्हिडीओ

“तू सासूबाईंकडून महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायला शिकलीस का?” असा प्रश्न जिनिलीयाला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खुपच आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी व ठेचा़ बनवतात. मी माझ्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवलं आहे.”

आणखी वाचा – तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पिठल्यामध्येही प्रोटीन आहे. मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी तेल वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते. कारण त्यामध्येच तेल असतं. मला पुरणपोळी तर खूपच जास्त आवडते.” जिनिलीया अस्सल मराठमोळे पदार्थ खाते. त्याबरोबरीने ती घरातही विविध पदार्थ बनवते.