देशभरात सध्या आयपीएलच्या १७ व्या हंगामाची जोरदार चर्चा चालू आहे. यातील १४ वा सामना सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. मुंबईने दिलेलं १२६ धावांचं लक्ष्य सहज पार करत राजस्थानने ६ विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला. १७ व्या हंगामातील हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नसल्याने मुंबईचा संघ IPLच्या गुणतालिकेत १० व्या स्थानी घसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संघाच्या पराभवाचा दोष सगळ्या चाहत्यांकडून सतत हार्दिक पंड्याला दिला जात आहे. याशिवाय भर मैदानात सुद्धा त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. सोमवारी नाणेफेकी दरम्यान घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “लघाटे आंबेवाले…”, मुग्धा-प्रथमेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू करणार आंबा व्यवसाय; म्हणाले, “अस्स्ल रत्नागिरी…

समालोचक आणि माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी नाणेफेकीवेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचं नाव उच्चारलं. सर्वसाधारणपणे वानखेडे स्टेडियम मुंबईचं होमग्राऊंड असल्याने मुंबईचा कर्णधार आला की, चाहते एकच जल्लोष करतात. पण, मांजरेकरांनी हार्दिकचं नाव घेताच उपस्थितांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुढे, त्यांनी मुंबईच्या चाहत्यांना हार्दिकला टाळ्यांसह पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. पण, टाळ्यांऐवजी हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली. यानंतर मांजरेकर यांनी चाहत्यांना खेळभावना जपत ‘फॅन्स behave’ अशी सूचना केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हार्दिकला चाहत्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल क्रिकेटसह अन्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : “आईने तिला राखी बांधायला…”, लग्नाआधी बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर एकत्र राहायच्या श्रीदेवी; म्हणाले…

मराठी अभिनेता व दिग्दर्शक पुष्कर जोग याने देखील यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. सोमवारी सामन्याआधी झालेल्या नाणेफेकीचा व्हिडीओ शेअर करत पुष्कर लिहितो, “हार्दिकला मिळणारी ही वागणूक खरंच चुकीची आहे. हे आता खूप जास्त होतंय. पंड्या आपल्या भारतीय संघाचं देखील प्रतिनिधीत्व करतो तसेच त्याने आपल्या भारतीय संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. मी सुद्धा रोहितचा चाहता आहे पण, कोणत्याही भारतीय खेळाडूला अशी वागणूक मिळू नये. हार्दिकने केलेल्या गोष्टी कदाचित चुकीच्या असतील पण, आपल्या भारतीय खेळाडूचा अशाप्रकारे अनादर करणे अत्यंत चुकीचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
pushkar
पुष्कर जोग इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, आता मुंबई इंडियन्स संघाची पुढची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. रविवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.