अभिनेत्री गिरीजा ओकने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘जवान’ चित्रपटांमध्ये गिरीजाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या गिरीजाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर नुकतीच अभिनेत्रीने मॅजिकएफच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला.

हेही वाचा : Video : “देशसेवेसाठी तुम्ही अनेक दिवस…”, क्रांती रेडकरची पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट, म्हणाली…

‘जवान’मध्ये शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना गिरीजा म्हणाली, “शाहरुखने मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, चित्रपटातील कोणतीही भूमिका छोटी किंवा मोठी नसते. चित्रपट हा प्रत्येकाचा असतो आणि आपण सगळे मिळून एक चित्रपट बनवतो…मग तुमची भूमिका छोटी असो किंवा मोठी…त्याने सांगितलेली ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिल.”

हेही वाचा : “…म्हणूनच तुम्ही सिनेसृष्टीमधून बाहेर झालात”; नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “घरी या…”

किंग खानविषयी सांगताना गिरीजा पुढे म्हणाली, “शाहरुखने प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगितली. तो म्हणायचा, आज मी एवढा मोठा अभिनेता आहे, उत्तम काम करतोय हे सर्वांना दिसतंय पण, यापूर्वी खूप मोठा प्रवास आणि संघर्ष करून हा टप्पा मी गाठला आहे. एकेकाळी माझे चित्रपट चालत नव्हते, मला कामही मिळत नव्हतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढ-उतार येतात पण, यावर रोज उठून काम करत राहणं हा एकमेव पर्याय आहे. काम करणं सोडू नका. असं शाहरुख नेहमी सांगायचा. अर्थात त्याच्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.”

हेही वाचा : छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’च्या सायलीचं वर्चस्व कायम, जुई गडकरीने शेअर केली पोस्ट, पाहा संपूर्ण TRP यादी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या किंग खानच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.