‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. एमटीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’मधून नावारुपास आलेला जय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जयने त्याच्या इन्स्टाग्रावर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओनंतर ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे, अशी चर्चा होत आहे.

कपिल शर्माच्या शोमधील अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाइव्हदरम्यान उचललं धक्कादायक पाऊल, कारण…

जय दुधाणेने ‘माझी आवडती व्यक्ती वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला होता, पण त्याने कुणालाही टॅग केलं नव्हतं. या व्हिडीओमध्ये जय आणि मिस्ट्री गर्लचे रोमँटिक पोज असलेले फोटोही होते. त्यानंतर काहींनी यावर ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी,’ अशा कमेंट्सही केल्या. त्याचं खाली सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलने कमेंट करत जयचे आभार मानले आहेत, त्यामुळे ही मिस्ट्री गर्ल दुसरं कोणी नसून हर्षला असल्याचं दिसतंय.

जयने शेअर केलेल्या व्हिडीओवर हर्षला पाटीलने “माझा वाढदिवस इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद, हा वाढदिवस कायम लक्षात ठेवण्यासारखा होता,” अशी कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये तिने रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
harshalaa patil comment
हर्षला पाटीलची कमेंट

दरम्यान, जय दुधाणेच्या अफेयरच्या चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सिमरन बावाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जयच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात दिसणार आहे.