अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. तिचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रमाणे ती स्वतः देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या मनातल्या भावना व्यक्त करत असते. पण आता पहिल्यांदाच ती मराठीत बोलताना दिसतेय.

अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या वेड चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाने प्रेक्षकांबरोबरच हिंदी कलाकारांनाही भुरळ घातली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स या चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तर आता करीना कपूर हिने तिच्यामते वेड म्हणजे काय हे मराठीतून सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

रितेश देशमुखने नुकताच करीनाबरोबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात रितेश करीनाला विचारतो, “तुमच्यासाठी वेड म्हणजे काय?” त्यावर करीना म्हणते, “वेड म्हणजे तुमच्या चित्रपटासारखं आहे. हा एक वेडेपणा आहे, एक नशा आहे, हा प्रेमासाठी असलेला वेडेपणा आहे. ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही.” त्याचबरोबर तिने रितेशला चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘वेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं तर जिनिलीयाने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रदर्शनानंतर तीन दिवसांतच या चित्रपटाने कमाईचा एकूण दहा कोटींचा आकडा पार केला. तर सर्वत्र या चित्रपटाचे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.