मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी मुंबईपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घरे बांधली आहेत. यात प्राजक्ता माळी, अवधूत गुप्ते, मृण्मयी देशपांडेसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. यात आता आणखी एका मराठी कलाकार जोडप्याचं नाव सामील झालं आहे, ते म्हणजे मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘वाळवी’, ‘चि. व चि. सौ. का.’ तसंच ‘नाच गं घुमा’ अशा अनेक कलाकृती दिल्या आहेत.

मधुगंधा कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीने तिच्या फार्महाऊसचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून तिने फार्महाऊसची झलक शेअर चाहत्यांबरोबर शेअर केली होती. या फार्महाऊसमध्ये त्यांनी एक छोटंसं तळं आणि गोठाही बांधल्याचं पाहायला मिळालं. या फार्महाऊसचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते.

अशातच तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने दोन गायी घेतल्या दत्तक घेतल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांचं नामकरणही केलं आहे. या व्हिडीओमध्ये मधुगंधा असं म्हणते, “फार्म हाऊस बांधला तेव्हाच गोठ्याची व्यवस्था मी करून ठेवली होती. पण कधी गाई दत्तक घेण्याची हिंमत केली नाही. कारण, गायींच्या संगोपनाविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी मला फारशी माहिती नव्हती.”

यानंतर ती सहकाऱ्यांच्या गोशाळेचा उल्लेख करत असं म्हणते, “मध्यंतरी गोशाळेला भेट देण्याचा योग आला. तेव्हा मलाही गायी पाळण्याचा आत्मविश्वास आला. त्यानंतर मी लक्ष्मी आणि सरस्वतीला दत्तक घेऊन ‘हिरण्य’ फार्ममध्ये आणलं. मी त्यांना मनापासून आपलंसं केलं आहे आणि मला खात्री आहे की, त्या पण मला स्वीकारतील आणि माझ्या हिरण्य फार्मला आपलंसं करतील. मग या फार्मचा लक्ष्मी आणि सरस्वती निवास होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मधुगंधाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी अभिनेत्रीच्या या अनोख्या कृतीचं कौतुकही केलं आहे. मेघा धाडे, ऋषिकेश शेलार, अमृता खानविलकर, मनवा नाईक, शर्मिष्ठा राऊत, सुकन्या मोने यांसह अनेक कलाकारांनी मधुगंधाच्या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच चाहत्यांनीदेखील या कृतीचं कौतुक केलं आहे.