सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर आता या चित्रपटालादेखील प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाने IMDB रेटिंग्जमध्ये सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटालादेखील मागे टाकलं आहे.

२८ एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. तर सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. प्रेक्षक हा चित्रपट आवडल्याचं सोशल मीडियावरून सांगत आहेत.

आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं सुरु होताच प्रेक्षकांनी केले असे काही की…; व्हिडीओ व्हायरल

सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत असताना या चित्रपटाला IMDB या साईटने दिलेले रेटिंग्ज समोर आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला या साईटवर ९.६ रेटिंग्ज मिळाले आहेत. या चित्रपटाने २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाला याबाबतीत मागे टाकलं आहे. सलमान खानच्या चित्रपटाला IMDBने ७.३ रेटिंग्ज दिले आहेत.

हेही वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची कथा, त्याचं दिग्दर्शन, संवाद, गाणी, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटाचे शो सध्या हाऊसफुल्ल होत आहेत.