‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्गज अभिनेते महेश मांजरेकरांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मराठीसह हिंदी कलाविश्वात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच महेश मांजरेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

महेश मांजरेकर राज ठाकरे यांच्याविषयी म्हणाले, “मी त्याला राजा म्हणतो आणि त्याने तेवढा हक्क मला दिला आहे. मी कधी वेगळं काही बोललो की, तो लगेच मला ‘राजा म्हण’ असं सांगतो. त्याच्यासारखा मित्र कुठेही भेटणार नाही. अडचणींच्या काळात तो मदतीसाठी सदैव तत्पर असतो. माझ्यापासून एक फोन लांब असलेली व्यक्ती म्हणजे राज ठाकरे. तो खऱ्या अर्थाने दिलदार मनाचा माणूस आहे.”

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन सासूबाईंना ‘या’ नावाने मारते हाक, वाढदिवशी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“राज ठाकरे या राज्याची धुरा सांभाळतोय हे मला कधीतरी बघायचंय आणि माझी खात्री आहे की, तो आपल्या राज्याला नक्कीच वेगळा दर्जा मिळवून देईल.” असं मत महेश मांजरेकरांनी मांडलं आहे.

हेही वाचा : Video : शाहरुखचे ‘जबरा फॅन्स’! मन्नतबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी, किंग खानने लेक अबरामसह दिल्या ईदच्या शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महेश मांजरेकरांबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ते ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.