दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात ७ प्रसिद्ध मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर. सत्य या चित्रपटाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

सत्य ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दत्ताजी पागे या मावळ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. तेव्हापासून तो विविध कारणांनी त्याला ट्रोल होत आहे. तसंच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आहे. आता त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “रिफ्रेश होण्यासाठी लोक गोव्याला जातात पण…” हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सत्य सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या आयुष्यातील घडामोडी सर्वांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याच्या आईबरोबर एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना त्याने एक खास कॅप्शनही लिहीलं आहे. आईबरोबरचा एक फोटो पोस्ट करत त्याने लिहीलं, “मम्मी.” यासोबतच त्याने एक रेड हार्ट इमोजीही टाकला आहे.

हेही वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्य मांजरेकर हा महेश मांजरेकर आणि त्यांची पहिली पत्नी दिपा मेहता यांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी महेश मांजरेकर आणि त्यांची पहिली पत्नी दिपा मेहता हे काही कारणांनी विभक्त झाले. आता त्याने पोस्ट केलेल्या फोटोवर त्याचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करत या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.