‘फक्त लढ म्हणा’, ‘मोरया’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता संतोष जुवेकर नेहमी चर्चेत असतो. संतोषने मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी छाप उमटवली आहे. त्याने मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. लवकरच तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही नशीब आजमावणार आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने नुकतीच आई-वडिलांसाठी खास आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने काल आई-वडिलांसाठी नवी गाडी खरेदी केली. ही नवी गाडी घेताना संतोष इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. हा आनंदाचा क्षण त्याने चाहत्यांबरोबर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत संतोषने लिहिलं, “सुख म्हणजे नक्की काय असतं…काय असतं पुण्य की जे…यांच्या डोळ्यात दिसत, आई बाबा आय लव्ह यू.”

हेही वाचा – आयरा खान-नुपूर शिखरेचे इंडोनेशियातील हनिमूनचे फोटो व्हायरल, आमिर खानची लेक पोस्ट शेअर करत म्हणाली…

या व्हिडीओत, अभिनेत्याचे आई-वडील गाडीवरचा लाल कपडा काढताना दिसत आहेत. त्यानंतर संतोषची आई गाडीतल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना पाहायला मिळत आहे. संतोषच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेने ‘वॉव’ असं म्हणत या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील ‘या’ अभिनेत्रीची ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत धमाकेदार एन्ट्री, पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संतोषच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या महिन्यात त्याच्या ‘स्ट्रगलर साला सीझन ३’चा सातवा एपिसोड प्रदर्शित झाला. लवकरच संतोष ‘छावा’ या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधरित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात विकी कौशल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना असे अनेक कलाकार दिसणार आहेत.