मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. हेमांगी अनेकदा आगामी प्रोजेक्ट, चित्रपट, करिअर व खासगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. हेमांगीने व्हॅलेंटाइन दिनानिमित्त खास लिहिली आहे.

हेमांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. पतीने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला दिलेल्या अंगठीचा फोटो हेमांगीने पोस्ट केला आहे. या पोस्टमधून हेमांगीने पहिल्या व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशनचा किस्साही सांगितला आहे.

हे माझं पहिलं Valentine gift. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या Pizza Hut मध्ये साजरा केला होता पहिला वहिला valentine day. आयुष्यात पहिल्यांदा Pizza खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता. हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली.
खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! (अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो ?)
तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा! तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे.
आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवसही साजरा होतो. गरजही भागते आणि आठवणही राहते.
आजही आम्ही असंच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा!
Happy Valentine’s Day from us to you! प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा!

हेही वाचा>> पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजताच शालिन भानोत आश्चर्यचकित, म्हणाला “दलजित कौर आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> Video: राखीला जवळ घेतलं, किस केलं अन्…; अभिनेत्रीने शेअर केला आदिलबरोबरचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

हेमांगी कवीने व्हॅलेंटाइन डे निमित्त केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. हेमांगीने मालिका व चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.