गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. अखेर २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला चित्रपट गृहात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटाला चित्रपटगृहात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे.

या चित्रपटाचं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटाची मांडणी चित्रपटात दाखवलेली दृश्य प्रेक्षकांना खूप भावली आहेत. IMDB साईटवर ‘सुभेदार’ला ‘तान्हाजी’ चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहेत. तर आता या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला किती गल्ला जमवला ते समोर आलं आहे.

आणखी वाचा : Subhedar trailer reactions: “साउथवाले ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ बनवतात आणि मराठी माणूस…”, ‘सुभेदार’चा ट्रेलर पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

या चित्रपटाला एकूण मिळणारा प्रतिसाद बघता हा चित्रपट किती कमाई करत आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. तर आता या चित्रपटाच्या टीमनेच त्याबद्दलची माहिती सर्वांची शेअर केली आहे. या चित्रपटात कुबादखान ही भूमिका साकारणारा अभिनेता ऋषी सक्सेना याने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यानुसार या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला पाच कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हेही वाचा : ‘सुभेदार’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ‘वेड’, बाईपण भारी देवा’ला मागे टाकत प्रदर्शनाआधीच नोंदवला ‘हा’ विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील कामासाठी या सर्वांचं खूप कौतुक होत आहे.