Navra Maza Navsacha 2 New Song : बहुचर्चित 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मराठी रसिक प्रेक्षकांचं लक्ष याकडेचं लागून राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटातील पहिलं गाणं कधी प्रदर्शित होणार? हे जाहीर केलं आहे. महिन्यापूर्वी सचिन पिळगांवकर यांनी स्वतः ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटातील एका गाण्याची हिंट दिली होती. ‘रेडिओ सिटी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, "‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. डबिंग पूर्ण झालं आहे. पोस्ट सध्या चालू आहे. त्याची धावपळ सुरू आहे. चित्रपटाचं चित्रीकरण करताना कलाकार म्हणून स्वप्नील जोशीने; जो मला माझ्या मुलासारखा आहे. त्याने या चित्रपटात जे काही काम केलं आहे, तर मला नाही वाटतं त्याने याआधी इतकं सुंदर काम कुठल्या दुसऱ्या चित्रपटात केलं असावं. चित्रपटात एक गाणं आहे; त्याची घोषणा मी वेगळ्या पद्धतीने गाण्यासकट करणारच आहे. पण त्या गाण्याबद्दल मात्र नक्कीच बोलायचं आहे. ते जे गाणं आहे ते चित्रपटाच्या शेवटी येत आणि ते गाणं मी व आदर्श शिंदेनं गायलं आहे.” हेही वाचा - Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ Navra Maza Navsacha 2 'नवरा माझा नवसाचा २' ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटातील याचं गाण्याचं पहिलं पोस्टर सचिन पिळगांवकरांनी नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'डम डम डम डम डमरू वाजे' असं गाण्याचं नाव आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदेसह सचिन पिळगांवकरांनी हे गाणं गायलं आहे. तसंच रविराज कोलथरकर यांनी संगीतबद्ध केलं असून प्रविण दवणे गीतकार आहे. उद्या, ९ ऑगस्टला 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटातील 'डम डम डम डम डमरु वाजे' हे पहिलं-वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हेही वाचा – Video: “त्याने अपमान नाही केला”, ‘त्या’ कृतीमुळे ट्रोल होणाऱ्या अरबाज पटेलसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “मुस्लीमसंबंधित नारेबाजी…” 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार? दरम्यान, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'नवरा माझा नवसाचा २' ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.