किशोरी गोडबोले या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ‘फुल ३ धमाल’, ‘खबरदार’, ‘वन रुम किचन’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेमुळे किशोरी गोडबोले घराघरांत पोहोचल्या. ही मालिका २००४ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जायची. आता सोशल मीडियावर त्यांच्या लेकीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू असते.

हेही वाचा : “निदान आज तरी लाल सिग्नलचा…”, शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

किशोरी गोडबोले यांच्या मुलीने आईप्रमाणे २०२१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांची मुलगी सई गोडबोले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनय आणि गाण्याबरोबरच ती उत्तम नृत्यदेखील करते. सईने मराठीतील अनेक जुनी गाणी नव्या रुपात गायली आहेत. सध्या किशोरी आणि सईचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘या’ कारणामुळे ‘कुछ कुछ होता है’च्या प्रदर्शनाच्या दिवशी करण जोहरला देशाबाहेर जावं लागलं होतं

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलिडा’ या गाण्यावर या दोन्ही मायलेकी गरबा खेळल्या आहेत. हा व्हिडीओ सईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडीओला दोन दिवसांत ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : “पैशासाठी काहीही नका दाखवू”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले, ‘त्या’ सीनमुळे मालिकेला केलं ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kishori godbole
किशोरी गोडबोले

किशोरी आणि सई गोडबोले या मायलेकींच्या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. पूजा सावंत, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, ऋजुता देशमुख, सुप्रिया पिळगावकर अशा अनेक मराठी कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी “तुम्ही दोघी सारख्याच दिसता” अशा प्रतिक्रिया सईने शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत. दरम्यान, सई गोडबोले लवकरच अतुल परचुरे, अजिंक्य देव, पूजा सावंत या दिग्गज कलाकारांबरोबर ‘तू, मी आणि अमायरा’ या चित्रपटात झळकणार आहे.