‘चिटर’ आणि ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटांमुळे खऱ्या आयुष्यातदेखील पूजा आणि वैभवमध्ये छान मैत्री जुळून आली. गेल्या अनेक वर्षांपासून वैभव, पूजा आणि भूषण प्रधान एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटणार? जोगतीण सांगणार सत्य, पाहा नवा प्रोमो

पूजा आणि वैभव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वाढदिवस असो किंवा मैत्रीदिवस ते नेहमी एकमेकांबरोबर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. पूजा-वैभवने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही कलाकार १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या एका सदाबहार मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

हेही वाचा : Video : मायरा वायकुळने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, ‘या’ एका कृतीने वेधलं लक्ष

उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांचं १९७५ मध्ये प्रदर्शित झालेलं “एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं” प्रेक्षकांच्या मनावर आजही कोरलेलं आहे. या सदाबहार गाण्यावर वैभव आणि पूजाने रोमँटिक डान्स केला आहे. यामध्ये दोन्ही कलाकारांचे हावभाव लक्ष वेधून घेतात. “एक लाजरा नं साजरा मुखडा” हे गाणं ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या प्रसिद्ध अल्बममधील असून या गाण्याचं लेखन जगदीश खेबूडकर यांनी केलं आहे. ९० चं दशक ते आजतागायत हे गाणं घराघरांत लोकप्रिय आहे.

हेही वाचा : ‘कुछ कुछ होता है’ झाला २५ वर्षांचा! वाचा माहित नसलेले ‘हे’ खास किस्से

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वैभव-पूजाने या जुन्या गाण्यावर डान्स केल्याने नेटकरी दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अवघ्या एका तासात दोघांच्या व्हिडीओवर ८५ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “पूजा आणि वैभवची केमिस्ट्री भारीच आहे”, “आमची आवडती जोडी”, “कमाल”, “मॉर्डन लूक आणि रेट्रो गाण्याचं सुंदर मेळ”, अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय काही जणांनी ‘भेटली तू पुन्हा’च्या सीक्वेलची तयारी सुरू आहे का? असे प्रश्न वैभव-पूजाला कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहेत.