भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ नाटक सध्या रंगमंचावर जोरदार सुरू आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणार हे कौटुंबिक नाटक रसिक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी देखील या नाटकाचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेते अजिंक्य देव यांच्यानंतर लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘अस्तित्व’ या नाटकाचं कौतुक केलं आहे.

स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात भरत जाधव यांच्यासह चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर प्रमुख भूमिकेत काम करत आहेत. हे नाटक पाहून दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “अस्तित्व…एक भारावून टाकणारा भारदस्त अनुभव… भरत जाधव तू एक प्रचंड ताकदीचा अभिनेता आहेस हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही…पण रंगमंचावर Pauses मधे जागा कशा काढाव्या हे तुझ्याकडून शिकण्या सारखं आहे…चिन्मयी तुझ्या बरोबर ‘चेकमेट’नंतर काम करता आलं नाही, एकच पुन्हा एकदा वाईट वाटलं यार… तू कमाल करतेस…हार्दिक जाधव आणि सलोनी तुम्ही कधीच नवखे वाटला नाहीत….खूप कौतुक दिग्दर्शक स्वप्नील जाधवच …. अप्रतिम मांडणी आणि खूप सुंदर काँपोझिशन्स….वा मज्जाच आली भरत…रंगमंचावरचा हा भारावून टाकणारा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा…”

हेही वाचा – Video: ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पडला पार; अभिनेता प्रसाद ओक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “साहेबांच्या…”

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिता लोखंडे आणि निल भट्टमध्ये कडाक्याचं भांडण, पाहा नवा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अस्तित्व’ या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. या नाटकात एका अशा कुटुंबाची कथा दाखवली आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. या कुटुंबात एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत, असं दाखवण्यात आलं आहे.