Prajakta Mali Birthday : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत मेघना हे पात्र साकारलं होतं. मालिकेला छोट्या पडद्यावर भरभरून प्रेम मिळालं. याचप्रमाणे प्राजक्ता माळीची लोकप्रियता सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर प्राजक्ता पुढे चित्रपटांकडे वळली. जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन देखील करते. अशा या प्राजक्ताचा आज ३५ वा वाढदिवस आहे.

प्राजक्ताने आज वाढदिवसानिमित्त तिच्या लाखो चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. बुधवारी सायंकाळी, “उद्या तुम्हाला काहीतरी खास पाहायला मिळेल” अशी पोस्ट प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली होती. यानंतर वाढदिवसानिमित्त अभिनेत्री नेमकं काय करणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ( Prajakta Mali ) सर्वांना गुडन्यूज दिली आहे.

हेही वाचा : ऑनलाइन TRPच्या यादीत मोठा उलटफेर! ‘बिग बॉस मराठी’ने पहिल्याच आठवड्यात मिळवलं ‘हे’ स्थान, टॉप-१० मालिका कोणत्या?

नऊवारी साडी, भरजरी दागिने, नाकात नथ असा मराठमोळा लूक करत प्राजक्ताने तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्ता लिहिते, “११ ऑक्टोबर २०२४ पासून तुमच्या मनावर राज्य करायला येतेय…’फुलवंती’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात”

‘फुलवंती’ चित्रपटाबद्दल प्राजक्ता माळी काय म्हणाली?

‘फुलवंती’बद्दल प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) म्हणते, ”या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले… याबद्दल देवाचे आभार. ‘फुलवंती’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की ‘फुलवंती’ का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले; साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी ‘फुलवंती’ एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य ‘फुलवंती’ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. ‘फुलवंती’मध्ये साथ लाभलेल्या पॅनोरमा स्टुडिओजच्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. ‘फुलवंती’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल.”

हेही वाचा : Video : व्हायरल कन्नड गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! दोघांची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले, “तुमची जोडी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
prajakta mali
प्राजक्ता माळी ( Prajakta Mali )

वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित आहे. प्राजक्ताच्या सगळ्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत… नव्या चित्रपटासाठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. अमृता खानविलकर, प्रसाद ओक, प्रियदर्शिनी इंदलकर, स्वप्नील जोशी, राधा सागर, सुबोध भावे या सगळ्या कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राजक्ताचा ( Prajakta Mali ) ‘फुलवंती’ चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.