मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात फ्लॅटमध्ये त्यांच्या मृतदेह आढळला. रवींद्र यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मराठीतील यशस्वी व देखणे अभिनेते असलेल्या रवींद्र महाजनींचा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊयात.

Ravindra Mahajani Death: “आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”

रवींद्र महाजनी यांचा जन्म १९४९ साली पुण्यात झाला होता. ते दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील नोकरीसाठी मुंबईला गेले. त्यांचे वडील स्वांतत्र्यसैनिक व पत्रकार होते. रवींद्र शाळेत असल्यापासून त्यांना अभिनयाची आवड होती, मोठं झाल्यावर नाटक व सिनेमात काम करायचं हे त्यांचं स्वप्न होतं. पण, शिकत असताना ते परीक्षेत नापास झाले. त्यांना वडिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

पुणे: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

रवींद्र यांनी खालसा कॉलेजमध्ये बीएसाठी प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये रॉबीन भट्ट, शेखर कपूर, रमेश तलवार, अशोक मेहतादेखील शिकायचे. या सर्वांनाच सिनेसृष्टीची ओढ होती. पण, वडिलांचं निधन झालं आणि रवींद्र यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. सर्वांचा सांभाळ करण्यासाठी काम करणं, पैसे कमावणं गरजेचं होतं. म्हणून रवींद्र यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. शिवाय काही लहानमोठी कामंही केली. पण त्यांच्या मनात अभिनयाची ओढ कायम होती. त्यामुळे ते दिवसा निर्मात्यांना भेटायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे. तीन वर्षे हाच त्यांचा दिनक्रम होता.

“देखणा नट गमावला”, रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावुक; म्हणाले, “त्याचा सर्वात मोठा गुण…”

रवींद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘गोंधळात गोंधळ’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘जाणता अजाणता’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी ‘झुंज’, ‘आराम हराम आहे’, ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पाऊले’ यामध्ये काम केलं. मराठी शिवाय त्यांनी हिंदी, मराठी व गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. रवींद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनीदेखील उत्तम डान्सर व अभिनेता आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली होती. या बापलेकाच्या जोडीने ‘पानीपत’ व ‘देऊळबंद’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मुलाच्या ‘कॅरीऑन’ चित्रपटात त्यांनी कॅमिओ केला होता.