लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरुन गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. या सर्व प्रकरणानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. आता गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटात झळकणार आहे.

आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने स्वत:च चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे.  

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील ही चर्चेत आली होती. गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना दिसत आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं होतं.