सई ताम्हणकर जवळपास २० वर्षे मराठी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्रीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बिनधास्त आणि बोल्ड अशी ओळख असलेल्या सईने नुकतीच मुंबई तकच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी तिने ट्रोलिंग, लग्न, राजकारणातील आवडते नेते अशा अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

सईला ताम्हणकरला यावेळी “तुझा आवडता राजकीय पक्ष कोणता आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “सई ताम्हणकर हाच माझा आवडता पक्ष आहे. कारण, माझ्या पक्षाला मीच पुढे घेऊन जाऊ शकते. पण, मला कोणते राजकीय नेते आवडतात याचं उत्तर मी जरूर देऊ शकते.”

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा जबरदस्त डान्स, पतीसह नेटकऱ्यांनी केल्या खास कमेंट्स

सई ताम्हणकर म्हणाली, “नितीन गडकरी साहेब मला खूप आवडतात. त्यांचं काम, त्यांचं बोलणं मला खूप आवडतं. एक धडाडीचे नेते म्हणून मला बाळासाहेब ठाकरे खूप आवडायचे. याशिवाय सुषमा स्वराज, देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ही दिग्गजमंडळी मला आवडायची. या सगळ्यांबद्दल मला आणि आपल्या सर्वांनाच नेहमीच आदर वाटतो.”

हेही वाचा : रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी अगदी मनापासून सांगते या व्यतिरिक्त तुम्ही मला राजकारणाबद्दल काहीही विचाराल, तर मी अगदी ढ आहे. राजकारणात कोणाचं काय चालू आहे याबद्दल मला अजिबात ज्ञान नसतं हे मी प्रामाणिकपणे मान्य करते. माणुसकी ही एकच जात माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.” असं स्पष्ट मत सईने मांडलं.